जिओ इन्स्टिट्यूट आढळल्यास कळवा आणि ११ हजार रुपये मिळावा, मनविसेचे आवाहन

 टीम महाराष्ट्र देशा : रिलायन्स फाऊंडेशनचे कागदोपत्री असलेल्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला ‘गुणवत्ता संपन्न’ असे प्रशस्तिपत्र दिल्यामुळे मोदी सरकारला विरोधकांनी निशाण्यावर धरले आहे, आणि आता मनविसेनेही सरकारची खिल्ली उडवली आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवली आहे ती सापडल्यास कळवा आणि मिळावा 11 हजार रुपयांचे बक्षीस, असे उपरोधिक आवाहन मनविसेने केले आहे. जिओ इन्स्टिट्यूटला गुणवत्ता संपन्न असा दर्जा मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने आता खुलासा केला आहे. नियमानुसार काही नव्या संस्थांनाही उत्कृष्ट संस्थांच्या यादीत स्थान देता येत असल्याचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर सुब्रमण्यम यांनी सांगितले.

कागदावरुन प्रत्यक्षात येण्यापूर्वीच जिओ इन्स्टिट्यूटला ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’चा दर्जा मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या निर्णयाचे समर्थन केले आहे. दुसरीकडे पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिओ इन्स्टिट्यूटविरोधात काढलेले पत्रक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

उद्या लाँच होणार जिओचा १५०० रुपयांचा फोन;अशी करा फोनची बुकिंग

Loading...

जिओच्या ग्राहकांना करता येणार मोफत शॉपिंग

Loading...