दोषी आढळल्यास मंत्रिपद सोडेल- सुभाष देशमुख

If you find guilty, the minister will leave - Subhash Deshmukh

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अनधिकृत बंगल्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘मी दोषी आढळल्यास मंत्रिपद सोडेल’ असे देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

सुभाष देशमुख यांचा बंगला अवैध असल्याचा स्पष्ट अहवाल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला हा अहवाल सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या अहवालामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तर आहवाल सादर करताच आयुक्त ढाकणे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading...

सुभाष देशमुखांनी अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर बंगला बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाला याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आपला बंगला अधिकृत जागेतच बांधल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.

सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुभाष देशमुखांनी आलिशान बंगला बांधल्याचं समोर आल आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत