व्हिडीओ:आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा उपचार घेणार नाही ; गोळीबारात जखमी शेतकऱ्याची भूमिका

शेवगाव /रवी उगलमुगले: शेतकरी आंदोलनादरम्यान सहकारी शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर इथून पुढचा उपचार करून घेणार नाही अशी भूमिका पोलिसांकडून शेवगावमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारातील जखमी उद्धव मापारी यांनी घेतली आहे.

ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं  होतं   शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले तसेच  हवेत गोळीबारही केला ज्यात २ शेतकरी जखमी झाले होते. गोळीबारात उद्धव मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाले होते . दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.

दुसरीकडे आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या.दरम्यान आंदोलनादरम्यान सहकारी शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर इथून पुढचा उपचार करून घेणार नाही अशी भूमिका जखमी उद्धव मापारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हॉस्पिटल प्रशासन पेचात असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पहा काय म्हणाले उद्धव मापारी 

You might also like
Comments
Loading...