fbpx

आघाडी झाली नाही तरी चालेल पण भाजप-सेनेचा पराभव करा ! :अजित पवार

अजित पवार

इंदापूर :  “आघाडी झाली नाही तरी चालेल पण  भाजपा सेनेचा पराभव करा” असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीमध्ये समविचारी पक्ष सोबत घेऊन लढू तसेच आघाडी झाली नाही तरी चालेल पण इंदापूर मधील जागा सोडणार नाही, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.