Swachh Bharat Abhiyan- ‘शौचालयासाठी पैसे नसतील तर पत्नीला विका’

वेब टीम:- स्वच्छ भारत अभियानानिमित्त जनजागृती करण्यासाठी आलेल्या बिहारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली. ‘शौचालय बांधायला पैसे नसतील तर पत्नीला विका,’ असा अजब सल्ला या जिल्हा दंडाधिकाऱ्याने गावकऱ्यांना दिला आहे. या धक्कादायक सल्ल्यामुळे सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
कंवल तनूज असं या जिल्हा दंडाधिकाऱ्याचं नाव आहे. ते बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्याचे दंडाधिकारी आहेत. ते स्वच्छ भारत अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी एका गावात आले होते. गावकऱ्यांना घरात शौचालय बांधण्याचे महत्त्व समजावून सांगत असताना गावकऱ्यांनी त्यांना शौचालय बांधायला पैसे नसल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांनी शौचालय बांधण्यासाठी पैसै नसेल तर पत्नीला विका आणि घरात शौचालय बांधा, असा अजब सल्ला दिला.
त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कनवल तनुज तुमच्या पत्नीची प्रतिष्ठा या १२ हजार रूपयांपेक्षा जास्त आहे का?, असा सवाल विचारताना दिसत आहेत. स्वत:च्या पत्नीच्या प्रतिष्ठेच्या मोबदल्यात १२ हजार रूपये घेणे, तुमच्यापैकी कुणाला पटेल का, असेही त्यांनी विचारले. त्यावर एक गावकरी आमच्याकडे घरात शौचालय बांधायला पैसे नाहीत, असे म्हणाला. तेव्हा तनुज यांनी त्याला म्हटले की, मग तुझी बायको विकून टाक. अनेक लोक आगाऊ पैसे देण्याची मागणी करतात. मात्र, है पैसे मिळाल्यानंतर लोक ते फालतू गोष्टींवर खर्च करतात. असेही तनुज यांनी म्हटले.या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरा वरुन टिका होत आहे.