पक्षात येणाऱ्यांना पदे दिली नाहीत तर बाकीचे कसे येणार- दानवे

danave vs rane

पुणे – बाहेरील पक्षातून येणाऱ्यांना पदे दिली नाहीत तर बाकीचे आमच्या पक्षात कसे येणार?सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपमध्ये होणारे इनकमिंग आणि त्या नेत्यांना दिली जाणारी पदे याचं जाहीरपणे समर्थन केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घेण्यात आली. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काँग्रेसला सोडचिट्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जातं होतं याबद्दल दानवे यांनी विचारलं असता. ‘राणे यांना विधानपरिषद उमेदवारी अथवा मंत्रिपदाचे कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते मात्र भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा विचार केला जाणार’ असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शेतकरी कर्जमाफी प्रकरणी थोडा उशीर झाला असून येत्या महिनाभरात सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचही त्यांनी सांगितलं.