कुलगुरु केबीनमध्ये घुसून अांदोलन करण्याचा जेडियूचा इशारा

uni pune1

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या सेट परिक्षेत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक, सांकेतांक क्रमांक शाईने गडद करून भरायचा असतो मात्र काही विद्यार्थ्यांकडून ही माहिती भरण्यास गफलत होती. परिक्षार्थींनी परीक्षकांमार्फत पेपर तपासून निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू कार्यालयासमोर दि.२२ ऑगस्ट रोजी उपोषण केले होते. सेटप्रकरणी चौकशीकरून दहा दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश कुलगुरू डॉ.नितीम करमळकर यांनी एका समितीला दिले होते. परंतु या समितीची केवळ एक बैठक झाली असून अद्याप कोणताही अहवाल तयार झाला नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे कुलगुरूंनी दिलेले आश्वासन हवेतच विरले असून उपोषणकर्त्या परिक्षार्थींना न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात झाला आहे.

सेट परिक्षेत तांत्रिक चुकांमुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या अडीच हजार परिक्षार्थींपैकी काही परिक्षार्थींनी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या मांडल्यानंतर सेटप्रकरणी चौकशी करून दहा दिवसांमध्ये अहवाल मागविण्यात येईल तसेच पुढील ४५ दिवसांमध्ये निकाल लावण्यात येईल असे आश्वासन ;वासन कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी उपोषणकर्त्या परिक्षार्थींना देऊन उपोषण सोडवले होते.परंतु दहा दिवसांनतर चौकशी अहवालासंदर्भात फारशी सकारात्मककारवाई झाली नाही.त्यामुळे कुलगुरूंनी दिलेल्या लेखी आश्वासनांचा त्यांना विसर पडलेला दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात कोणताही अनुचित प्रकार घडला की त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करून झालेले प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर त्या समितीला प्रकरणाची चौकशीकरून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात येतात. समिती कधीही वेळेत अहवाल देत नाही.यात मोठ्या प्रमाणात वेळ जातो व शेवटी सगळ्यांना झालेल्या प्रकरणाचा विसर पडलेला असतो. असा प्रकार अनेकवेळा विद्यापीठात घडला आहे.सध्या सेटप्रकरणात देखील असाच प्रकार सुरू आहे.त्यामुळे यातून काहीही साध्य होणार नसल्याची खात्रिलायक माहिती आहे.

सेट विभागाचे विभागप्रमुख डॉ.बाळासाहेब कापडणीस म्हणाले, सेट परीक्षेत तांत्रिक चुकांमुळे अपात्र ठरविण्यात आलेल्यापरिक्षार्थींची अडीच हजार एवढी संख्या नाही. यात विद्यार्थ्यांच्या देखील अनेक चुका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी मान्य देखील केल्या आहेत. तरीसुध्दा समितीची एक बैठक झाली असून आता अजून काही बैठका घेण्यात येतील. त्यानंतर अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल विद्यापीठामार्फत युजीसीला पाठविण्यात येईल. युजीसीकडून जर सकारात्मक निर्णय आला तरच परिक्षार्थींचे पेपर तपासले जातील. परंतु अपात्र परिक्षार्थींची संख्या, समितीचे सदस्य तसेच
चौकशीची सद्य:स्थिती यासंदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

एकंदरीतच सेटप्रकरणातील सद्यस्थितीवरून परीक्षार्थींचे पेपर तपासले जाणार का? याबद्दल शंकाच निर्माण झाली असून आता उपोषणकर्त्यांसाठी लढणारे जेडियू चे प्रदेश सरचीटनीस कुलदीप आंबेकर म्हणाले, जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत माघार नाही. शातंतेच्या मार्गांनी न्याय मिळत नसेल तर आता कुलगुरु कँबीन मध्येच घुसून तीव्र अांदोलन केले जाईल.