घटनेचा रिपोर्ट तयार नसताना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? – पंकजा मुंडे

परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचं नव्हत तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे. वैद्यनाथ कारखान्यातील घटनास्थळावर जाण्यास आपणास मनाई करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Loading...

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना हादरून टाकणारी होती. गेली अनेक वर्षे हा कारखाना व्यवस्थित चालू होता, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले तरीही सर्व मोट बांधून प्रभावी यंत्रणा राबवली व गाळप यशस्वीपणे सुरू केले. दुष्काळ व ऊसाच्या उपलब्धता यामुळे चिंता असायची परंतु यावर्षीच्या पावसाने ऊस छान झाला ,शिस्त व प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही या हंगामात गाळपाचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. कर्मचाऱ्यांचा पगारही 3 डिसेंबर रोजीच देण्यात आला होता. शिवाय दुष्काळ आणि कारखाना बंदमुळे थकीत पगारही जानेवारीच्या अगोदर करण्याचे आम्ही जाहीर केले होते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. दोन वर्षाच्या संघर्षानंतर कारखान्याची परिस्थिती पुर्ववत चागली झाली असताना नेमके मुंडे साहेबांच्या जयंतीच्या अगोदर झालेली दुर्घटना हादरून टाकणारी व विचारात पाडणारी आहे असे त्या म्हणाल्या.

या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणं, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणं हे प्रथम कर्तव्य असतं, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला. जखमी कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर्स व लातूरला हलविण्यासाठी अॅम्ब्यूलन्स यासाठी संचालक व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आर्थिक व्यवस्थेबरोबर त्यांना मानसिक आधार देण्याचं काम आम्ही केलं असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचा घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वतःच्या शाबासकीच्या बातम्या स्वतःच देणं आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं त्यांनी केलेलं स्टेटमेंट राजकारणानं बरबटलेलं होतं असे त्या म्हणाल्याLoading…


Loading…

Loading...