खबरदार! विनामास्क ‘एसटी’त चढाल तर

smart city bus

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. अचानक रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून विविध पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. औरंगाबाद विभागाच्या एसटी प्रशासनाने देखील वाढते कोरोना रुग्ण पाहता विदर्भात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विना मास्क प्रवाशांना एसटीतच नव्हे तर बसस्थानकातही प्रवेश दिला जाणार नाही अशी तंबीच विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे.

शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची साखळी पसरण्यास सुरूवात झाली आहे. दररोज शंभर ते दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने देखील प्रवाशांना काही नियम लागू केले आहेत. विना मास्क असलेल्या प्रवाशांना बस मध्ये यापुढे चढू दिले जाणार नाही. मास्क घालूनच एसटीने प्रवास करावा लागेल. मास्क न घातलेल्या काही प्रवाशांना बस खाली उतरवले जात असल्याचे सांगण्यात आले. यापुढेही या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सिया यांनी दिली. तसेच दररोज बसचे सॅनिटायझेशन होत असून स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत.

लॉकडाऊन काळामध्ये एसटीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. हळूहळू आता एसटी पूर्वपदावर येत होती. मात्र आता रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा एसटी प्रशासनावर याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. एसटीची प्रवासी संख्या दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाली आहे. आधीच झालेले आर्थिक नुकसान अजूनही भरून निघालेली नाही त्यात पुन्हा एकदा हा तोटा त्यामुळे येते दोन ते तीन वर्ष यातून बाहेर पडण्यास लागतील. असे मत एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP