fbpx

विकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: यंदाच्या निवडणुकीतील बीड येथील पहिल्याच जाहीर सभेत प्रितम मुंडेंनी जोरदार बॅटींग केली. ‘मागील पाच वर्षात जिल्ह्यात काय विकास झाला हे जर विरोधकांना दिसत नसेल तर नक्कीच त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. माणुसकीच्या नात्यातून आगामी महाआरोग्य शिबिरात त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फुकटात करून देऊ’, असे प्रत्युत्तर खासदार प्रितम मुंडे यांनी विरोधकांना दिले.

आपल्या पहिल्याच भाषणात मुंडे यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. आपण केलेल्या विकासकामाचा पाढाच त्यांनी जनतेपुढे वाचला. जिल्ह्यात वेगाने होत असलेले राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा रस्ते, बीडचे पासपोर्ट ऑफिस, अत्याधुनिक शौचालय हे जर विरोधकांना दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आगामी महाआरोग्य शिबिरात त्यांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून देऊ तसेच श्रवणयंत्रही मोफत देऊ असा चिमटा देखील त्यांनी नाव न घेता विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला.