‘तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा’

nitesh rane

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे.

इंद्रा सोहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.

या निर्णयावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी आता महाविकास आघडीवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलेली आहे. ‘ या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे.सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे.कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा..शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे..तोंड वाजवून न्याय भेटत नसेल..तर तोंडात वाजवून न्याय मिळवा.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान, आता मराठा आरक्षण रद्द करण्याच निकाल जाहीर होताच मराठा समाजामध्ये सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समजणे आंदोलनाचा पवित्र हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या