थांबू शकत नसाल तर राज्यसभेवर पाठवू; भाजपकडून राणेंना ऑफर

नारायण राणे

मुंबई: नारायण राणे यांनी मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर असल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे. तसेच मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. असेही राणेंनी स्पष्ट केले.

नारायण राणे यांनी बुधवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

काय म्हणाले नारायन राणे?

मुख्यमंत्र्यांनी मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबतचा शब्द दिला आहे. मात्र यासाठी विलंब का होत आहे, याची मला कल्पना नाही. त्याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील. काही गोष्टींबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे थांबू शकत नसाल तर राज्यसभेवर पाठवू, अशी ऑफर भाजपने दिली आहे. मात्र महाराष्ट्रात मंत्री की राज्यसभा याबाबतचा निर्णय विचार करुन कळवू, असं मी त्यांना सांगितलं आहे.