टीम महाराष्ट्र देशा: सध्या सर्वत्र दिवाळीची Diwali धूम सुरू असून सगळीकडे दिवाळीच्या फराळांना जोर आला आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक घरात खास पदार्थ बनवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश होतो. दिवाळी दरम्यान आपण सतत हे पदार्थ खात असतो पण अनेक दिवस हे पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडण्याची शक्यता वाढू शकते. त्याचबरोबर तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात उष्णता आणि जळजळ देखील वाढते. त्यामुळे मानवी शरीरात अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने जळजळ आणि ऍसिडिटी या समस्या होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पोटदुखी आणि पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. पण या समस्यांवर तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमच्या पोटाला आराम देऊ शकतात.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ झाल्यास काय करावे?
बडीसोप
तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने जर पोटात जळजळ होत असेल तर बडीशेप खावी. कारण बडीशेप ही अतिशय थंड असते त्यामुळे बडीशेप खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. विशेषता उन्हाळ्यात जेवणानंतर बडीशोप खाल्ल्याने शरीरातील उष्णतेची पातळी कमी होऊ शकते. त्याचबरोबर बडीशेपचे सेवन केल्याने पोटातील गॅसच्या समस्या पासून देखील आराम मिळतो.
पुदिना
पोटातील उष्णता शांत करण्यासाठी पुदिना हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. मसालेदार आणि तेलकट खाल्ल्यानंतर डॉक्टर पुदिना खाण्याचे सल्ला देतात. पुदिना खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होते. पुदिन्यांमध्ये उपलब्ध असलेले अँटी एक्सीडेंट आणि अँटी बॅक्टेरियल औषधी गुणधर्म पोटातील उष्णता आणि ऍसिड शांत करते. त्याचबरोबर नियमितपणे पुदिनाचे सेवन केल्यावर शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.
इलायची
इलायची ही अतिशय थंड असते त्यामुळे पोटात जळजळ झाल्यास इलायचीचे सेवन करावे. इलायचीचे सेवा केल्यानंतर तोंडाला आणि पोटाला थंडावा मिळतो. पोटातील उष्णता किंवा ऍसिडची समस्या वाढली असे तुम्हाला वाटेल तेव्हा इलायची किंवा इलायचीच्या चहाचे सेवन करावे.
तुळस
तुळशीमध्ये अनेक पोषक घटके मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे पोटाची जळजळ शांत करण्यासाठी तुळस हा एक सर्वोत्तम उपाय मानला जातो. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटातील ऍसिड तयार होण्याची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर तुळशीचा रस पोटाच्या अनेक समस्या पासून तुम्हाला दूर ठेवू शकतो.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- IND VS PAK | कोहली-हार्दिकने दिवाळी साजरी केली, पाकिस्तानला लोळवले ; 4 विकेट राखून विजय
- Travel Guide | ‘या’ ठिकाणांना भेट देऊन आपल्या जोडीदारासह दिवाळीच्या सुट्ट्यांचा घ्या आनंद
- IND vs Pak | पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा भावूक, राष्ट्रगीत गाताना अश्रू अनावर!
- Brahamastra | रणवीर आणि आलियाचा सुपरहिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच होणार OTT रिलीज
- IND VS PAK | भारताची खराब सुरवात! पहिल्या 7 ओव्हरमध्ये 4 खेळाडू तंबूत