Share

Hair Care Tips | केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यापासून त्रस्त असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत येताना अनेक समस्या घेऊन येतो. प्रामुख्याने त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या समस्यांचा समावेश होतो. हिवाळ्यामध्ये केस कोरडे होतात. त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा (Dandruff) वाढण्याची समस्या देखील निर्माण होते. परिणामी केस पांढरे होऊन गळायला लागतात. त्याचबरोबर केसांमध्ये खाजही यायला लागते. परिणामी केसांमध्ये घाण वाढून केस तेलकट दिसायला लागतात. त्यामुळे या हिवाळ्यामध्ये आपले केस निरोगी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत. हे उपाय स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात.

हिवाळ्यामध्ये केसांना (Hair) कोंड्यापासून दूर ठेवण्यासाठी पुढील उपाय करा

दही

केसातील कोंडा दूर करण्यासाठी दही हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये दही घेऊन केसांच्या मुळापर्यंत ते हाताने लावावे लागेल. त्याचबरोबर दही लावल्यावर तुम्ही हलक्या हाताने केसांची मसाज करू शकता. दही केसांना लावल्यावर दहा-पंधरा मिनिटे डोक्यावर ते तसेच राहू द्या. त्यानंतर केस धुतल्यावर तुम्हाला परिणाम दिसू लागेल. दह्यामध्ये काळी मिरी टाकून सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकतात.

कडुलिंब

केसातील कोंडयाचे प्रमाण कमी करण्यासाठी कडुलिंब मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून घ्यावी लागेल. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल गुणधर्म आढळतात जे कोंडा दूर करण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या पानाची बनवलेली पेस्ट डोक्यावर काही वेळ राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. नियमितपणे केसांना कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यावर तुमच्या केसतील कोंडा दूर होईल.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा वापर आणि देखील तुम्ही केसांतील कोंडा दूर करू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये खोबरेल तेल आणि त्यामध्ये थोडेसे लिंबू मिसळावे लागेल. खोबरेल तेल आणि लिंबू यांचा हेअरमास्क डोक्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवल्यानंतर केस धुवा. खोबरेल तेल आणि लिंबाच्या मदतीने केसातील कोंडा तर दूर होईलच पण त्याबरोबर केसात येणारी खाज देखील कमी होऊ शकते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत येताना अनेक समस्या घेऊन येतो. प्रामुख्याने त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या समस्यांचा …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now