Share

Travel Update | दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ‘या’ जागांचा नक्की करा विचार

फिरायला जाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सुट्ट्यांची वाट बघत असतात. आणि आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे फिरायचा कुठे जायचे? असे प्लॅन्स आता सगळीकडे सुरू असेल. तुम्ही देखील फिरायला जाण्याचे प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला भारतातील काही आकर्षक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

स्पिति व्हॅली (Spiti Valley)

स्पिति व्हॅली (Spiti Valley) देशातील हिमाचल प्रदेश या राज्यात स्थित आहे. हिमाचल मधील शिमला, मनाली बद्दल आपण खूप ऐकलेले आहे पण त्याचबरोबर स्पिति व्हॅली (Spiti Valley) देखील खूप सुंदर जागा आहे. तुम्ही जर ट्रेकिंगची आवड असेल तर स्पिति व्हॅली (Spiti Valley) तुमच्यासाठी परफेक्ट लोकेशन आहे. ताबो, की गोम्पा, शाक्य टांग्युड येथील मुख्य आकर्षण आहेत. या ठिकाणाला भेट देण्यासाठी दिवाळी दरम्यानचे वातावरण अगदी योग्य आहे.

उदयपूर (Udaipur )

राजस्थान मधील उदयपूर हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. या शहरामधील राजवाडे या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. राजवाड्यांबरोबरच या शहरातील तलाव देखील खूप प्रसिद्ध आहे. पिचोला तलाव, फतेह सागर, उदय सागर, स्वरूप सागर, रंगसागर ही प्रमुख आकर्षण आहे. तलावांच्या काठी बसून तुम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तुम्ही जर 4 दिवस सुट्टी प्लॅन करत असाल तर उदयपूर तुमच्यासाठी बेस्ट जागा आहे. कारण उदयपूर लोककला, उत्सव, संगीत आणि कॅम्पेन साठी खूप प्रसिद्ध आहे.

अराकू व्हॅली (Araku Valley)

जर तुम्हाला जंगल आणि दऱ्यांमध्ये फिरायची आवड असेल तर अराकू व्हॅली (Araku Valley) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक जागा देखील आहेत. कटिकी, चपराई, रणगिल्डा, सांगडा, कोठापल्ली, अनंतगिरी, धारगड्डा धबधबा या जागा  पर्यटकांना आकर्षित करतात. इथे स्थित असलेले कॉफी म्युझियम देखील पर्यटकांना खूप आवडते.

उटी (Ooty)

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील उटी हे एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्ही फॅमिली सोबत किंवा तुमच्या जोडीदारासोबत उटीची ट्रीप प्लॅन करू शकतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उटीच्या परिसरात हिमस्खलन तलाव, बोटॅनिकल गार्डन आणि कालाहट्टी धबधब्यांसह अनेक आकर्षक जागा आहेत. या सोबतच इथले चहा कॉफी माळे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे.

महत्वाच्या बातम्या 

फिरायला जाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सुट्ट्यांची वाट बघत असतात. आणि आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे फिरायचा कुठे …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now