सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने महारष्ट्र बंदची हाक दिली. राज्यभर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीवर भाजपने टीकेची झोड उठवली. त्यातच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

३ पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि जेमतेम २५% काही ठिकाणी बंद दिसला, महविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण सत्तेत असून जर १०० टक्के बंद होत नसेल म्हणजे तुमची काय लायकी आहे यावरून लक्षात येते. सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिवाजी महाराजांची आज्ञा होती. पण आजच्या बंद दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली. काहीतरी लाज राखा वाझेच्या औलादीनो, शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरडे ओढले असते, अशा शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या