फडणवीसांची चौकशी करणार असाल तर शिवसेना मंत्र्यांची देखील चौकशी करा : आठवले

ramdas athwale vs uddhav thakrey

मुंबई : कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी (open enquiry) करण्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे.

यासंदर्भात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश देऊन भाजपला चांगलाच दणका दिला आहे.

यावर, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. “राज्य सरकारने सुडापोटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर त्यावेळी संबंधित मंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण मात्र करु नये.” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली!

धार्मिक स्थळं सुरु करण्याची आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी आंदोलनही केले. परंतु उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली आहेत. शिवसेना आज फडणवीस सरकारमध्ये असती तर ही वेळ नसती आली. शिवसेनेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये आणि त्यांनी सर्व धार्मिक स्थळं उघडावीत. गरज पडली तर पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळं उघडावीत.

महत्वाच्या बातम्या-