मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र, पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
दरम्यान, स्वत: शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार कौटुंबिक कारणास्तव मागे घेत आहे, असं सांगितलं. पण तक्रार मागे घेऊन देखील विरोध धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने काही न काही आरोप करून सरकारला धारेवर धरण्याचे प्रयत्न करत आहेत. बलात्काराची तक्रार मागे घेऊनही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.
‘विरोधकांनी उगाचच फाटे फोडू नयेत. मग इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप लांब जाईल. कोणी काय लपवाछपवी केलीय हे संगळ्यांनाच माहिती आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.
धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत खुलासा केला आहे. तरीही त्यांच्यावर टीका होत आहे. आता विरोधक तोंडघशी पडल्यानंतर वेगळा आरोप केला जात असला तरी त्याला मर्यादा हवी. मुंडे यांना करूणा शर्मा यांच्याबाबत जे सांगायचे होते ते जाहीरपणे सांगितले आहे. विरोधक उगाचच फाटे फोडत आहेत असं त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मार्ट सिटी बसच्या ग्रामीण फेऱ्यांवरुन एसटी आणि सिटी प्रशासनात जुंपली
- ‘अंबानी-अदानी हे या देशाला लुटायला निघाले आहेत, त्यांच्या कंपन्यांवर बहिष्कार टाका’
- उद्धव ठाकरेंनी तीन वर्षे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावे; रामदास आठवलेंचा ठाकरेंना सल्ला
- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयंतीनिमित्त तात्पुरता चबूतऱ्यावर बसवा : देशमुख
- विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे – देवेंद्र फडणवीस