‘आमच्या नेत्यांविषयी काही बोलात तर खपवून घेणार नाही…’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप कायमच सुरू असतात. यात महिला पदाधिकारी देखील मागे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

चाकणकर यांनी ‘चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला,’ अशी खोचक टीका केली होती. यावर प्रत्त्युत्तर देतांना खापरे यांनी देखील शरद पवार यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवली असल्याची आठवण करुन दिली आहे.

या संबंंधी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केलाय. त्या म्हणाल्या की, ‘रुपाली चाकणकर तुम्ही साधी महानगरपालिकेची निवडणूक देखील नाही निवडून आलात..आणि तुम्ही प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा बद्दल बोलताय…. तुम्ही कुठे दादा कुठे…. याद राखा आमच्या नेत्यांविषयी काही बोलात तर खपवून घेणार नाही…’

महत्त्वाच्या बातम्या