fbpx

कलम ३७० काढून घेतल्यास भारताचा जम्मू-काश्मीरवर कब्जा होईल : मेहबुबा मुफ्ती

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर राज्याला प्रदान करण्यात आलेले कलम ३७० जर रद्द केले तर राज्यात बळजबरीची सत्ता होईल अस म्हणत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० चा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेत ३७० कलमा अंतर्गत जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीर हे भारतात असून देखील एक स्वतंत्र राज्य आहे.

कलम ३७० वर बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीर राज्याला असलेले कलाम ३७० काढून घेतल्यास राज्यात बळजबरीची सत्ता होईल तसेच ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन वर इजरायलचा कब्जा आहे त्याप्रमाणेच जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यास, भारताचा देखील जम्मू-काश्मीरवर कब्जा होईल असे त्या म्हणाल्या.

1 Comment

Click here to post a comment