हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे रहा; शिवसेनेचं निलेश राणेंना उत्तर

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. “निवडणूक लढवायला हिंमत लागते. विजय किंवा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे फक्त तिकीट वाटप करु शकतात.” असं ट्वीट करतं नीलेश राणे आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.
त्याला आता शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती भरकटू शकतो याचं हे उदहारण आहे. हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे राहून दाखवा, पुन्हा हरवायला आवडेल’, अशा शब्दात अमेय घोले यांनी निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. यापूर्वीही आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तसेच त्यांच्यासाठी उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्यासाठी तयारी देखील केली होती.