नोकरीच्या नियुक्तीचा मार्ग निकाली न काढल्यास… आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : आम्ही घर सोडून फक्त नोकरीचा प्रश्न सुटावा म्हणून इथं आलो आहोत, आता जर आमची दखल घेतली नाही, तर आम्ही थेट मातोश्रीवर जाऊ. तसेच मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरीच्या नियुक्तीचा मार्ग निकाली न काढल्यास आत्मदहन करू, असा थेट इशाराच आझाद मैदानातील आंदोलकांनी दिला आहे.

शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांत उत्तीर्ण होऊनही मराठा समाजातील साडेतीन हजार उमेदवारांना तीन वर्षांपासून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. आता या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची कुणीही दखल न घेतल्याने आता या आंदोलकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Loading...

“प्रश्नातील काही अधिकारी मुद्दामहून आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत केवळ बैठकीवर बैठका झाल्या मात्र, निर्णय होत नाही. आम्ही घर सोडून फक्त नोकरीचा प्रश्न सुटावा म्हणून इथं आलो आहोत. आता जर आमची दखल घेतली नाही, तर आम्ही थेट मातोश्रीवर जाऊ. त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाहीत. जर इथं कुणी आत्महत्या केली, तोडफोड झाली, जाळपोळ झाली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. अशी संतप्त प्रतिक्रियाही या आंदोलकांनी दिली आहे.

2014 मध्ये झालेल्या परीक्षेत 3700 तरुण-तरुणींनी परिक्षा उत्तीर्ण केली. मात्र, आजपर्यंत या तरुणांना नियुक्ती मिळाली नाही. 5 वर्षांपासून पात्र होऊनही नियुक्ती न मिळाल्याने अखेर या तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. तसेच या तरुणांचं वय वाढत असून ज्यासाठी पात्र झाले आहेत, त्यासाठीची किमान वयोमर्यादा ओलांडण्याचा धोकाही या तरुणांसमोर आहे. त्यामुळे त्यांना आपल्या हक्काच्या नोकऱ्यांना मुकावं लागणार आशयाची भीतीदेखील आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?