तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेला वाद थांबताना दिसत नाही. कारण दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल तर मुंबईत २४ तासात भाजपचा महापौर बसवू शकत असल्याच विधान केल होत. त्यानंतर आता शिवसेनेकडून मुख्यमंत्र्याना प्रत्युतर देण्यात आल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनात आणल तर सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकत असल्याच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

मुंबईत शिवसेनेचा महापौर बदलून भाजपचा करणे अवघड नाही हे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. अशी विधान करण्यापेक्षा त्यांनी राज्यात अच्छे दिन कसे येतील यावर बोलावे असेही ते म्हणाले.