सत्तेत आल्यास राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे कलम रद्द करू : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रात सत्तेत आल्यास राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम १२४ अ रद्द करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्याला ‘जन आवाज’ असे नाव देण्यात आले आहे. हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला.

न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. त्यांनी बेरोजगारीच्या विषयावर भाष्य करत सत्तेत आल्यास वर्षभरात 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊ, असं मोठं आश्वासन राहुल यांनी दिलं.

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

  • उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ३ वर्षापर्यंत परवानगीची गरज नसेल.
  • मनरेगा १०० दिवसांऐवजी वाढवून १५० दिवसांचा रोजगार देणार.
  • शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प.
  • शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास गुन्हा ठरणार नाही जीडीपीच्या ६ टक्के शिक्षणावर खर्च करणार.
  • पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार.
  • सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम १२४अ देशद्रोहाशी संबंधित कलम वगळू.
  • पूर्वोत्तर राज्यांत आणि जम्मू काश्मीरमध्ये तैनात लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्फा या कायद्यात संशोधन करण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.