fbpx

सत्तेत आलो तर निवडणुक आयोगाला जेलात टाकू : आंबेडकर

संदेश कान्हु/यवतमाळ :- पुलवामाची घटना मॅच फिक्सीग असून यावर काही बोलले की निवडणुक आयोग रोक लावते ही यंत्रणा ही भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या यांना ही जेल ची हवा खायला पाठवू असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. तर सध्याचे भाजप सरकार बिनडोकांचे सरकार असून त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेच्या मंचावरून त्यांनी हे वक्तव्य केले.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवित असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असुदुद्दीन ओवैसी यांची प्रचार सभा आयोजित केली होती. मात्र ओवैसी या सभेला आले नाही. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या पंचवीस मिनीटाच्या भाषणात भाजपा आणि कॉग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षाला सत्ते पासून दूर ठेऊन डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या असे आवाहन केले. शिवाय आम्ही सत्तेत आल्यावर केजी टू पीजी पर्यन्तच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेल मध्ये असेल असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचे नेतृत्व मोदीच्या राजकारणाचे बळी ठरत असून काँग्रेस मधील गांधी विचारधारा असलेल्यांची गळचेपी होत आहे. असे ही ते म्हणाले. तर पुलवामाची घटना मॅच फिक्सीग असून यावर काही बोलले की निवडणुक आयोग रोक लावते ही यंत्रणा ही भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या यांना ही जेल ची हवा खायला पाठवू अशी चेतावनी ही त्यांनी दिली. याचे पडसाद कसे उमटतील हे येत्या काळात दिसून पडेल.