‘विराट फॉर्ममध्ये परतला की तिहेरी शतकही झळकावेल’

‘विराट फॉर्ममध्ये परतला की तिहेरी शतकही झळकावेल’

virat

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. कोहलीच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर सडकून टीका होताना दिसत आहे. यावरच आता भारताचा माजी कर्णधार कपिल देव विराटच्या समर्थनात उतरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोहली एकदा फॉर्मात आला की तो तिहेरी शतकही करेल.

विराट कोहली नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी शतक झळकावू शकला नाही. मात्र, भारताचा माजी कर्णधार कपिल देव कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे आणि कोहली फॉर्मात उतरला की तिहेरी शतकही ठोकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कपिल देव म्हणाले, ‘इतकी वर्षे जेव्हा तो धावा करत होता तेव्हा कोणीही असे म्हटले नाही की कर्णधारपदामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. आता अचानक हे प्रश्न का निर्माण झाले. कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात चढ -उतार येतात. जेव्हा त्याने दुहेरी शतक आणि इतकी शतके केली, तेव्हा कोणताही दबाव नव्हता, होता का? याचा अर्थ कर्णधारावर चर्चा होऊ नये. याव्यतिरिक्त त्यांच्या क्षमतांवर चर्चा केली पाहिजे.

अर्थात आलेख वर -खाली गेला आहे, पण हे किती काळ घडणार? तुमचे करिअर भरभराटीला येते तेव्हा वय 28 ते 32 असे असते. तो आता अनुभवी आणि प्रौढ झाला आहे. आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना विराट केवळ शतक किंवा द्विशतकच करणार नाही, तर तो 300 धावांची खेळीही खेळेल. तो आता अधिक परिपक्व झाला आहे आणि त्याला फिटनेसची समस्या नाही. त्याला फक्त स्वतःची ओळख करून मोठी धावसंख्या करायची आहे.’

महत्त्वाच्या बातम्या