लातूर: कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनला सर्व स्तरावरून विरोध होत आहे. विशेषता व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवावे अन्यथा मोठा उद्रेक होईल, स इशारा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. कोणत्याही समाज घटकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा न करता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या आदेशाबाबत लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात अघोषित लॉकडाऊन करण्यात आला असून याबाबत अनेकांकडून विरोध होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवरच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. शासनाने कडक निर्बंध आणून विकेंड लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने विरोधी पक्ष या नात्याने आम्ही या निर्णयाचे समर्थन केले होते.
परंतु, कडक निर्बधाच्या नावाखाली चक्क सर्व व्यापार बंद करून लॉकडाऊनच घोषित केल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे आदेश जशाला तसे राबविण्याचे निर्देश देऊन पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातील जनतेवर मोठा अन्याय केला आहे. व्यापारी, उद्योजक, कामगार तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासह लोकप्रतिनिधी या सर्वानी एकत्र येऊन काम सरकार विरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता असल्याचे निलंगेकर बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दुसऱ्या दिवशीही दहा बळी
- रुग्णांना बेड मिळवून देणारा मुंबई महापालिका पॅटर्न राज्यभर राबविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
- कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन तुमच्या पाठीशी; कार्यभार स्वीकारताच मुश्रीफांचे आवाहन
- ‘एक नारल दिलाय दर्यादेवाला’ ट्रेंडिंग गाण्यावर मुंबई इंडियन्सचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडीओ
- शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही – उद्धव ठाकरे