उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असला, तर कदाचित मी सांस्कृतिक कार्यमंत्री असेन- विनोद तावडे

मुंबई : मुलुंड येथे बुधवारपासून सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक समारोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

दरम्यान, यावर्षी सांगता झालेले नाट्यसंमेलन ९८वे आहे. दोन वर्षांनी शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असला, तर तेव्हाही कदाचित मीच सांस्कृतिक कार्यमंत्री असेन. अशी कोपरखळी विनोद तावडे यांनी मारली. त्यावर थेट भाष्य न करता मराठी माणूस म्हणून एकत्र या, असा सल्ला उद्धव यांनी आपल्या भाषणात दिला.

या वेळी संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

You might also like
Comments
Loading...