fbpx

उदयनराजे भोसले भाजपात आले तर आनंदचं होईल : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

उदयनराजे भोसले यांची भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे पक्षात आले तर आनंद होईल, आम्ही त्यांचे स्वागत करु, असे ते म्हणाले आहेत. news 18 ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी याबाबतचे विधान केले आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतराच्या दृष्टीने दोन्ही कडून अनुकूल परिस्थिती असल्याच दिसत आहे. मत्र उदयनराजे अंतिम निर्णय काय घेतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

दरम्यान उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेला खुद्द उदयनराजेंनी स्वल्पविराम लावला आहे. आज काही माध्यमांनी उदयनराजेंना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, "लोकांचे हित पाहून निर्णय घेईन. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. या भेटीत साताऱ्यातील विकासकामांबाबत आमची चर्चा झाली. पूर्वी माझी कामं होत नव्हती. परंतु फडणवीस यांनी माझी खूप कामं केली आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.