“…..हे कलम काढले तर जम्मू काश्मीर भारताबरोबरचा संबंध संपवेल” – मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर : ‘जर कलम 370 व 35 अ काढले तर ते चांगले होणार नाही, जर हे कलम काढले तर जम्मू काश्मीर भारताबरोबरचा संबंध संपवेल अशी धमकी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारला दिली आहे

नेमकं काय म्हणाल्या मुफ्ती ?

‘370 व 35 ए जम्मू-काश्मीरची एक वेगळी ओळख आहे, जी प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित ठेवली जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी बनणे आवश्यक आहे. जर जम्मू काश्मीरची परिस्थिती सुरळीत करायची असेल तर पाकिस्तानशी चर्चा करणे आवश्यक आहे आणि काश्मीर साठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मैत्रीचा हात द्यावा.जर कलम 370 व 35 अ काढले तर ते चांगले होणार नाही, जर हे कलम काढले तर जम्मू काश्मीर भारताबरोबरचा संबंध संपवेल’