Share

‘हे सरकार खरं हिंदुत्ववादी असेल तर….’ – चंद्रकांत पाटलांचे आव्हान

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्ववादाच्या प्रश्नावरून राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार उभे राहिले. छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलण्यासाठी काय हालाहाल करून मारले याचे वर्णन सांगताना सभागृहात सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. यामुळे धर्माबद्दल एक अभिमान जागरूक होतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, राज्यातले एक मंत्री म्हणतात धर्म बदलण्याने काय फरक पडतो आणि हिंदू मुलीचं मुस्लिम तरूणाशी लग्न लावून देण्याच्या कार्यक्रमाला अभिमानाने उपस्थित राहतात. संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि एक हिंदू मुलगी मुस्लिम होण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, ही या सरकारची नीती आहे. संभाजी महाराजांवर खोटं प्रेम आहे. जर खरं प्रेम असले असते तर एक मताने हा ठराव मंजूर केला असता, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्ववादाच्या प्रश्नावरून राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics Video