Share

Diwali 2022 | धनत्रयोदशी दिवशी ‘या’ गोष्टी दिसल्या तर तुमच्या घरात येईल लक्ष्मी

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी ला Diwali अवघे काही दिवस उरले असून राज्यात सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीमुळे राज्यातील बाजारपेठांमध्ये खरेदी विक्रीचा जोर वाढला असून सगळीकडे सणासुदीचा माहोल तयार झाला आहे. यावर्षी 22 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की धनत्रयोदशी दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये देवी लक्ष्मी ची कृपा जास्त असते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी पाहणे खूप शुभ मानले जाते असे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे. धनत्रयोदशी दिवशी काही  गोष्टी दिसल्यास माणसाचे नशीब उजळून लक्ष्मी माता त्यावर प्रसन्न होते अशी देखील मान्यता आहे. चला जाणून घेऊया धनत्रयोदशी दिवशी कोणत्या गोष्टी पाहणे फायदेशीर मानले जाते.

किन्नर

नपुंसक (किन्नर) हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या आशीर्वादाने गरीबही श्रीमंत होता अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला त्यांचे दिसणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी दिवशी त्यांचा आशीर्वाद लावण्यास आपल्या धनासंबंधीच्या समस्या संपुष्टात येतात. त्याचबरोबर आपल्यावर आयुष्यात कधीही पैसे उदर घेण्याची वेळ येत नाही असे देखील म्हटले जाते.

सरडा

सहसा आपल्याला सरडे दिसले की आपण घाबरून जातो किंवा आपल्याला त्याला बघून विचित्र वाटते. पण धनत्रयोदशीच्या दिवशी जर संध्याकाळी पूजेनंतर तुम्हाला सरडा दिसला तर ते शुभ मानले जाते. शास्त्रानुसार संध्याकाळी पूजेनंतर सरडा दिसणे देवी लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेची सूचक मानले जाते. असे घडल्यास आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन माता लक्ष्मी सोबत आपल्याला कुबेराचे आशीर्वाद लाभतात अशी देखील मान्यता आहे. सरडा दिसल्यानंतर ‘ओम महालक्ष्मी नमः’ या मंत्राचा जप करावा.

मांजर

रस्त्यावर चालताना मांजर आडवे जाणे नेहमी अशुभ मानले जाते. पण या उलट धनत्रयोदशीला पांढऱ्या मांजराचे दर्शन घडणे खूप शुभ मानले जाते. शकुन शास्त्रानुसार धनत्रयोदशी दिवशी पांढऱ्या मांजरीचे दर्शन घडल्यास दीर्घकाळ प्रवलंबित राहिलेले काम त्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आढळते. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी पांढरे मांजर दिसल्यास त्याचे दर्शन घ्यावे.

नाणे

धनत्रयोदशीला खास नाण्याची आणि धनाची पूजा केली जाते. त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी रस्त्यावर पडलेले नाणे सापडणे शुभ मानले जाते. हे सापडलेले नाणे सौभाग्य वाढीचे संकेत देते. रस्त्यावर सापडलेले नाणे तुम्ही उचलून ते तुमच्या पैशाच्या किंवा तिजोरी सोबत ठेवा. मुळे तुमच्या धनामध्ये वाढ होईल असे मानले जाते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी ला Diwali अवघे काही दिवस उरले असून राज्यात सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीमुळे राज्यातील बाजारपेठांमध्ये …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now