fbpx

…या अटी मान्य असतील तरचं करू युती – शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूका जवळ येताच भाजप-शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. त्यात दोन्ही पक्ष आता युती कोणत्या मुद्यांवर होईल याबाबत हुज्जत घालत आहेत. शिवसेनेने आता सत्ताधारी भाजप समोर पेचात टाकणाऱ्या अटीं घातल्या आहेत. शिवसेनेसाबोत युती करावयची असेल तर भाजपने शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. ही मोठी व महत्वाची अट घातली आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी. अशी भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारी अट घातली आहे. तसेच शिवसेनेन भाजपला ४८ तासांचा युतीबाबत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या ४८ तासात भाजपने निर्णय घेतला नाही तर शिवसेना स्वतंत्र लढण्यास सज्ज होईल व उमेदवारांच्या प्रचारास सुरवात करेल. त्यामुळे आता शिवसेनेच्या अटींवर भाजप पक्ष काय भूमिका घेईल हे पाहण उत्सुकतेच असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनी सत्ताधारी सरकारविरुद्ध एकी केली आहे. त्या अनुषंगाने भाजप देखील आता आपल्या मित्र पक्षांबरोबर युतीबाबत चर्चा करत आहे. पण विरोधकांनी भाजप विरुद्ध केलेली एकी ही भाजप च्या मित्र पक्षांना फायद्याची ठरत कारण भाजपचा पराभव व्हावा यासाठी विरोधक दुसऱ्या सरकारविरोधी धोरणांना जोरदार पाठींबा देत आहेत . त्यामुळे आता भाजपला या निवडणुकीत स्वतःचे बहुमत सिद्ध करण्यासाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. पण मित्रपक्ष आता भाजपच्या या दुबळ्या परिस्थितीचा चांगलाच फायदा घेत असल्याच दिसत आहे.