म.गांधींची हत्या झाली नसती तर आज देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता – कलानंद मणी

Mahatma Gandhi

सिंधुदुर्गनगरी  : महात्मा गांधीजींची हत्या झाली नसती तर आज भारत देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता. गांधीजींवर सहा हल्ले झाले. जर नथुराम गोडसेला गांधीजींचे विचार आचार पटले नव्हते तर हत्या करण्याऐवजी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावले नाहीत? गांधीजी हे वेगळय़ा विचारधारेचे होते, असे मत गोवा येथील गांधी विचारधारेचे विचारवंत कलानंद मणी यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ‘गांधी समजून घेताना’ याविषयी मणी यांनी विचार मांडले.

मणी म्हणाले, गांधीजी हे स्वतःला सनातन हिंदू समजत. गांधीजींकडे वेगळी दृष्टी होती. त्यांनी देशाला वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले होते. गांधीजींनी बहुजन समाजाला आणि सर्व जाती–धर्माला एकत्र आणण्याचे काम केले. गांधीजींची हत्या झाली नसती तर आज आपला देश वेगळय़ा धर्तीवर पाहायला मिळाला असता.

नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, श्रीराम वाचन मंदिरने ही व्याख्यानमाला सुरू केली आहे, ती कौतुकास्पद आहे. गांधीजींचे विचार देशाला निश्चितच प्रेरणा देणारे आहेत. पण आज आपला देश वेगळय़ा दिशेला झुकत चालला आहे.Loading…
Loading...