गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर ५६ इंचांची छाती असून उपयोग नाही- सिद्धरामय्या

मैसूर: “तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर नुसती ५६ इंचांची छाती असून उपयोग नसतो”, अशी टीका कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. कर्नाटक निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. नरेंद्र मोदी यांनी चामराजनगर येथील सभेत सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली होती. त्याला आज सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

नरेंद्र मोदी म्हणाले होते, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वत:साठी २+१ असे सूत्र करण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांच्यासाठी दोन तर त्यांच्या मुलासाठी एका मतदारसंघाची तजवीज केली जाते. या टीकेला उत्तर देतांना सिद्धरामय्या म्हणाले, मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असल्यामुळे मोदी माझ्यावर टीका करतात. परंतु, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

You might also like
Comments
Loading...