‘देशात संविधानाचं राज्य नाही तर…’; राऊतांची मोदी सरकारवर टीका

‘देशात संविधानाचं राज्य नाही तर…’; राऊतांची मोदी सरकारवर टीका

संजय राऊत

मुंबई : २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Constitution Day) म्हणून देशभरात साजरा केला जातो. केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे.
मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

एकेकाळी भाजप सोबत असणारी शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या बद्दल पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन असल्याचे म्हंटले आहे. याकारणामुळे आम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या: