शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजपला नुकसान- खा.अनिल शिरोळे

Anil-Shiroles

पुणे: भाजप-शिवसेना युती व्हावी अशी इतर भाजपमधील नेत्यांप्रमाणे माझी देखील इच्छा आहे. जर शिवसेनेसोबत युती झाली नाही तर पुणे शहरात तसेच राज्यभरात भाजपला फटका बसणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले

अनिल शिरोळे म्हणाले, शिवसेनेसोबत युती न झाल्यास पुणे शहरात मतांच विभाजन होऊन भाजपा फटका बसणार. कारण दोन्ही मतं एकमेकांना पूरक असतात. तसेच माझ्या मते कॉंग्रेस माजी आमदार मोहन जोशी यांना उमदेवारी देईल. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांना उदेवारी दिली तरी काही हरकत नाही. असे शिरोळे म्हणाले.

शहराच्या विकास संदर्भात बोलताना शिरोळे म्हणाले, केंद्रातून निधी मिळत असून तो खालच्या स्थरापर्यंत पोहचत आहे. तसेच समस्यामुक्त शहराच्या दिशेने गेल्या ४ वर्षात काम सुरु असून पुढील काळात पुणे स्मार्ट झालेले दिसेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे .