‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे

uddhav thakrey and raj thakrey

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याच वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वासंबंधी प्रश्न केला असता, ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत.’ असं सणसणीत उत्तर त्यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘माझा सामना, माझी मुलाखत’ अशी होती. एरव्ही उद्धव ठाकरेंना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सामान्यांच्या हिताबद्दल बोलले जात नाही. उद्धव ठाकरे सपशेल अपशयी ठरले आहेत,’ असा निशाणा त्यांनी साधला.

यासोबतच, ‘जर उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व असेल, तर ते दिसत का नाही. बेरोजगारी, वीजबील, या विषयावर ते बोलत का नाहीत. या मुलाखतीतून फक्त भाजपाला धमकवण्याचे काम झाले’ अशी खोचक टीका करत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या