हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, पुराव्यासकट मी सर्वांची यादी देतो; उदयनराजेंनी ठणकावले

सातारा : राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. मात्र, भाजपाने हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.

या सर्व घडामोडींवर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावे. पुराव्यासकट मी सर्वांची यादी देतो असे आव्हान त्यांनी दिले आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना त्यांनी ईडीच्या कारवाईवरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेतला आहे.

‘जसे आपण पेरतो तसेच उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन असे ते म्हणाले. तसेच ईडी कारवाईंच्या मागे भाजप असल्याच्या आरोपांबाबत त्यांनी विचारण्यात आले. यावर उदयनराजे म्हणाले की, ‘कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण’, असे म्हणत उदयनराजे यांनी ठणकावले.

महत्त्वाच्या बातम्या