Share

Suryakumar Yadav | विराट कोहलीसोबत सामना झाल्यास कोण जिंकणार?, प्रश्नावर सूर्याने दिले मजेशीर उत्तर

भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने यावर्षी अनेक विक्रम मोडले आहे. भारतीय संघातील उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू टी-20 मध्ये नंबर-1 क्रमांकावर आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये स्फोटक कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमार यादवने अलीकडे झालेल्या न्यूझीलंड (Newzealand) विरुद्धच्या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत एका मुलाखती दरम्यान त्याला एक प्रश्न विचारण्यात आले होती की, जर तुमचा विराट कोहली (Virat Kohli) सोबत सामना झाला तर कोण जिंकणार? या प्रश्नाचे सूर्याने मजेशीर पद्धतीने उत्तर दिले.

या प्रश्नाचे उत्तर देत असताना सूर्यकुमार थोडा विचार करून म्हणाला की, “मी” आणि त्यानंतर तो जोरात हसायला लागला. पुढे तो म्हणाला की,”वेस्टइंडीज चा किरॉन पोलार्ड आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये तुलना करायची झाली, तर यामध्ये नक्कीच भारतीय गोलंदाज आघाडीवर असेल.”

सूर्यकुमार यादवने यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 31 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 46 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राईकरेटने 1164 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय आणि दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे.

आयपीएल 2020 च्या 48 व्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने उत्तम कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामन्यामध्ये मुंबईने बेंगलोरचा 8 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यांमध्ये सूर्याने 43 चेंडू 79 धावांची नाबाद खेळी खेळली होती. तर दुसरीकडे विराट कोहली या सामन्यांमध्ये 14 चेंडूत 9 धावा करत बाद झाला होता. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या 

भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने यावर्षी अनेक विक्रम मोडले आहे. भारतीय संघातील उजव्या हाताने फलंदाजी करणारा …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now