‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’

‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’

atul bhatkhalkar

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या दुर्दैवी घटनेतील मृत महिलेला श्रद्धांजली वाहताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘साकीनाका अत्याचार पीडित दुर्दैवी महिलेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विनम्र श्रद्धांजली. ठाकरे सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था सरणावर गेली आहे. सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत. गुन्हेगारांना धाक कसा असेल?’ असा सवाल करत अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

विकृत वृत्तीचा कळस; संतापजनक कृत्य

पीडित महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. चाकूने हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही, तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या