‘बोलण्यासाठी ठोस मुद्दे नसतील तर, ट्रम्प यांनी किमान आपले थोबाड बंद ठेवायला हवे’

donald trump

वॉशिंग्टन : वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन उडालेला हा भडका आता थेट अमेरिकेची सूत्र हातळल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहोचला आहे. जवळपास ३० हून अधिक शहरांमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्याच बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. दरम्यान, नुकताच ट्रम्प यांनी एक जून रोजी राज्यांच्या राज्यपालांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यास सांगितले. आंदोलन मोडून काढून आंदोलकांना तुरुंगात डांबायला हवे. हे जर करता येत नसेल तर तु्म्ही वेळेचा अपव्यय करत आहात, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ह्युस्टन पोलीस प्रमुखांनी ट्रम्प यांना चांगलंच झापलं आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगू इच्छितो की, जर तुमच्याकडेही काही बोलण्यासाठी ठोस मुद्दे नाहीत. तर, किमान आपले तोंड बंद ठेवायला हवे. ट्रम्प यांच्यामुळे देशातील २०-२१ वर्षाच्या मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे. लोकांनी रस्त्यावर यावे आणि आक्रमक व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. देशाला सध्या एका नेतृत्वाची आवश्यकता आहे. या काळात आपण सर्व एक आहोत, अशी भावना राष्ट्राध्यक्षांकडून लोकांमध्ये जाण्यास हवी, असेही त्यांनी म्हटले.

मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो : ट्रम्प

तज्ज्ञ डॉक्टरचा मुंबईत कोरोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड

अमेरिकेने धमक्या देण्यापेक्षा कोरोनाबाधित इराणला मदत करावी