संप बेकायदेशिर ठरविल्यास एका दिवसाला ८ दिवसांचा पगार कापणार-अनिल परब

संप बेकायदेशिर ठरविल्यास एका दिवसाला ८ दिवसांचा पगार कापणार-अनिल परब

अनिल परब

मुंबई : गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांना पगारवाढ करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तरीही एसटी कामगार आंदोलन सुरूच ठेवत आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा दिली.

विलीनीकरण्म वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना पगार कपातीचा इशारा दिला आहे.

अनिल परब म्हणाले, न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला ८ दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाही. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल. एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. असेही परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या