‘शक्ती कायद्यासाठी एकत्र बैठकीला घाबरत होतात तर ऑनलाईन बैठक घ्यायची होती’, भाजपचा टोला

chandrkant patil

मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ‘शक्ती कायद्या’ची घोषणा व महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘परप्रांतीयांची नोंद ठेवा’ असे आदेश राज्यातील पोलीस यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान यावरूनच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

कोविडच्या काळात शक्ती कायद्यासाठी राज्य सरकारने बैठका केल्या नाहीत. आमच्यासोबत एकत्र बैठक करायला जर ते घाबरत होते तर व्हर्च्युअल बैठक करता आली असती. राज्यात शक्ती कायदा, महिला आयोग अध्यक्ष आणि महिला संरक्षण हा ऐरणीवर आलेला विषय आहे. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार करण्याचा इशारा दिला आहे. यावरच चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का? असं एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. तसा गुन्ह्यांचा अभ्यास करायला गेलो तर खूपच वेगळं सत्य बाहेर येईल. त्याचं काय करणार तुम्ही? त्याच्याही नोंदी ठेवणार का? असा खोचक सवालही चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या