राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नसता तर भाजपा सरकार आलेच नसते – चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा- देशात २०१४ च्या लोकसभेला भाजपा सह मित्र पक्षांना ३१ टक्के मते मिळाली होती. तर विरोधात ६९ टक्के मते होती. त्यामुळे आता विरोधक एक झाले आहेत. त्याचा परिणाम पोटनिवडणुकीत दिसला आहे. तर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नसता तर भाजपा सरकार आलेच नसते, अशी टीका राष्ट्रवादीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूरमध्ये बोलतांना केली आहे.

चव्हाण शनिवारी पंढरपूर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपवर देखील त्यांनी निशाणा साधला.सेनेबरोबर युती न झाल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल, शिवसेनेला भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा नाही. मात्र शिवसेने बरोबरची ही युती भाजपाची गरज आहे. असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. भाजपसोबत युती तोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेला भाजप सोडणार नाही. प्रसंगी, भाजपा साम, दाम, दंड ,भेद या नीतीचा वापर करेल असा इशारा चव्हाण यांनी या वेळी दिला.