राज्यपाल सरकारी पैशावर पोसलेले हत्ती, महाराष्ट्राला चूड लावाल तर…; सामनातून राऊतांचा इशारा

मुंबई : राज्यातील महिला असुरक्षित असल्याच्या मुद्द्यावरुन कायदा आणि सुवस्थेच्या प्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील पुढच्या काही तासांत राज्यपालांच्या पत्राला पत्रानेच खरमरीत उत्तर दिलं. त्यानंतर आता भाजप-शिवसेनेमध्ये राजकीय वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे.

राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात, असे राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.

केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका.

महत्त्वाच्या बातम्या