सरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडलं तर त्याचा दोष भाजपला देऊ नका : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

raosaheb danve

नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.

राऊत-फडणवीस भेटीनंतर सुरु झालेल्या चर्चांवर केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाष्य केलं आहे. “काही दिवसांपूर्वी मॉर्निंग व्हॉकला संजय राऊत आणि माझी भेट झाली होती, त्यानंतर आम्ही एकत्र चहा देखील पिला. अशा प्रकारे राजकीय नेते भेटल्यास त्यातून कोणतेही तर्क मीडियाने काढू नये” असे सांगतानाच त्यांनी सरकार पडण्याच्या शक्यता देखील व्यक्त केली आहे.

“हे तीन पक्षांचे सरकार एकमेकांच्या पायात-पाय अडकून पडले तर भाजपला त्याचा दोष देऊ नका. सद्या आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असून लोकहितासाठी काम करत आहोत. त्यामुळे हे सरकार पडण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचे” रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

या सरकारने लोकहिताच्या योजना राबवाव्या

रावसाहेब दानवे यांनी , “आमच्या सरकारच्या चांगल्या योजनांना आणखी निधी उपलब्ध करून आणखी आपल्या योजना सुरु कराव्यात व राज्याच्या हिताचे काम करावे” असा सल्ला देखील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तर, राजकीय मतभेद असले तरी वैमनस्य नसल्याचे देखील त्यांनी व्हिडीओच्या अखेरीस ठामपणे सांगितल्याने काही राजकीय शक्यता टाळता येणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या :