दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे समजते. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका पाहणे महत्वाचे आहे. त्यानुसार आमचीही भूमिका स्पष्ट केली जाईल. असे सांगतानाच जर सेना भाजपसोबत गेलीच तर आम्ही विरोधात बसण्याच्या तयारीत असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली”.
तसेच या गोष्टींवर चर्चेमधून तोडगा निघू शकतो. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यात असल्यास चर्चा करु, असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –