सरकारने आंदोलनाला जागा दिली नाही तर तुरुंगात उपोषण : अण्णा हजारे

जनलोकपाल आंदोलनासाठी सरकार जागा देत नसल्याचा अण्णांचा आरोप

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपालसाठी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. जनलोकपाल आंदोलनासाठी सरकार जागा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला पत्र पाठवूनही जागा मिळत नाही त्यामुळे तुरुंगात उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.

जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णा दिल्लीत २३ मार्चला शहीद दिनाच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मात्र सरकारला पत्र पाठवूनही आंदोलनासाठी जागा दिलेली नाही. जागा न दिल्यास तुरुंगात उपोषण सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.