‘सरकारला बलात्काऱ्यांवर कारवाई करता येत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करू’

पुणे : मुंबईतील साकीनाका परिसारात झालेल्या बलात्कार प्रकणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठले आहेत. 32 वर्षीय महिलेवर अमानुषणे अत्याचार करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिला मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले. विरोधकांनी तसेच नागरिकांनी आपला रोष व्यक्त करताना आरोपीच्या फाशीची मागणी केली आहे. यावर आता मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या आणि अशाच घटनांवर आपला संताप व्यक्त केला आहे.

सरकारला जर बलात्काऱ्यांवर कारवाई करता येत नसेल तर त्यांना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याचा चौरंगा करु, असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे. ‘जिथं नारी देवी म्हणून पुजली जाते तिथंच अत्याचार होत आहे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

देशात संविधान आहे, कायदा आहे, लोकशाही आहे, कायद्यामध्ये असं असत की, शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषाला शिक्षा देता येत नाही. भर चौकात फाशी देणं वगैरे हे करता येत नाही हे मला माहिती आहे. म्हणून आमच्यासारख्या महिलांच्या ताब्यात देऊन भर चौकात त्याचा चौरंगा करायचा म्हणजे परत तो बलात्काराचा ब देखील काढणार नाही, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

महिलांच्या नावाने खोटे गुन्हे दाखल करणं बंद केलं पाहिजे. त्यांच्यामुळे ज्या महिलांवर खरा अत्याचार झाला त्यांनी न्याय मिळत नाही. शक्ती कायदा आणला. अनिल देशमुखांनीच आणला. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर तो बाहेर पडला. माझी सरकारला हात जोडून विनंती करेल हे कुठे तरी थांबवा,  असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :